• Eka Ratricha Mukkam

    “एका रात्रीचा मुक्काम” हा अनेक कथांचा भावस्पर्शी कथा संग्रह आहे.यातील कथा वाचकास खिळवुन ठेवतात.यातील “प्रेम सुंगध” या कथेत प्रेमात त्याग व सत्य असेल तर ते खुप सुंदर होऊन त्याचा सुगंध दळवळत राहतो.”पश्चात्ताप” कथेतील नायक देव पश्चात्तापने होळपळतो आणि ख-या प्रेमाच्या अपेक्षेने एका काळी असलेल्या प्रेयसी व आता परीस्थितीने वेश्या व्यवसायाकडे वळलेल्या अमृताच्या मागे विनवणी करीत फीरतो.पण ती त्याच्याकडे दुर्लक्ष करुन एक प्रकारे सुडच घेते.”एका रात्रीचा मुक्काम” या चित्त थरारक कथेत अदीला भेटलेल्या लावण्यवतीच्या जिवनातील अनिश्चितता बरचं काही सागून जाते.”गहीरे तळे” या कथेतील रहस्य आपणास गुढ आणि रहस्यमयी वातावरणात घेवून जाते.या संग्रहातील कथेत विविधता असून मानवी मनाचे रोमहर्षक खेळ आपणास समजून घेता येतात.या सा-या कथांचा गाभा हा ‘प्रेम त्याग शारीरिक आकर्षण’ हा आहे.

    160.00